Thursday 5 February 2015

अधांतर

जीव गुंतला इतका
तुझ्याविना ठाव नाही
मिसळून अशी गेले
मला माझं नाव नाही

श्वास जोडते श्वासाला
कसे जगावे कळेना
आस डोळ्यात थिजली
तुझी सादही मिळेना

किती तग धरू आता
सोसवेना अधांतर
अंत व्हावा माझा तरी
किंवा संपावे अंतर


Copyright © roopavali. All rights reserved