Tuesday, 30 April 2013

चहा

सकाळच्या पहिल्या चहासारखं तुझं हसू
मनाला ताजवा देणारं

तू अवतीभोवती असण्याचा दरवळ
चहातल्या वेलदोड्यासारखाच निव्वळ

तुझी हवीहवीशी ऊब
घोटाघोटाने वाढणारी

पण या चहात मात्र … तुझ्या इतका गोडवा नाही !


अजूनही आहे एक फरक…

तुझ्यातला कैफ, तुझ्यातली नशा
या चहात नाही!


Copyright © roopavali. All rights reserved

Saturday, 27 April 2013

मोरपिशी

तुझ्या मनाचा मोरपिशी रंग
माझं आभाळ भरून राहीलाय
उधाणल्या तुझ्या सागरासवे
माझा किनारा केव्हाच वाहीलाय

Copyright © roopavali. All rights reserved

तू

मी या भरलेल्या आभाळाचा कुणीच नाही
तेव्हाच मोर होतो मी जेव्हा बरसतेस तू

सारेच सारखे ऋतू मला ना कौतुक त्यांचे
मी वसंत आला म्हणतो जेव्हा बहरतेस तू

मी दगड मानतो देवळांमधल्या मूर्तींना
पण आस्तिक होतो त्यांना जेव्हा विनवतेस तू

ना नाती मानत पण नकळत मी तुझाच होतो
वाळूत आपली नावे जेव्हा गिरवतेस तू
 
 
(मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशित)

Copyright © roopavali. All rights reserved

असे वाटते...!

हातून सुटले सारे काही असे वाटते
आयुष्याला अर्थच नाही असे वाटते

सगळे विसरून पुढेच जावे असे ठरवले
शल्य तरीही उरात राही, असे वाटते

अशक्य स्वप्नांचे मनातील ओंगळ बोजे
फेकून द्यावे दिशांस दाही, असे वाटते

नकोत गुंते आठवणींचे, नको अडकणे
जगणे व्हावे पुन्हा प्रवाही, असे वाटते...!


(मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशित)

Copyright © roopavali. All rights reserved

अनदेखा

कोहरे की यूँ चादर ओढे बैठा सूरज
ना जाने क्या अनदेखा करना चाहता है


Copyright © roopavali. All rights reserved

चांदणस्पर्श!

चांदणे मृदुल कायेवरूनी ओघळते
अस्वस्थ होऊनी धरा कुशीवर वळते
चंद्राच्या स्पर्शांमधेच सरते रात
मग उरी परंतु अजून ती का जळते?


Copyright © roopavali. All rights reserved

ख़ाली सा दिन

अपनी साँसों की आवाज़ सुनता हुआ
यूँ ख़ाली ख़ाली सा गुजरता दिन

बस मगर हर लम्हा तेरी यादोंसे भरा पडा है!


Copyright © roopavali. All rights reserved