Wednesday, 13 March 2013
सहजच..!
आयुष्यात ही जाणीव खूप भयानक वाटते... परतीचे दोर आपणच आपल्या हातांनी
कापल्याची! कॉलेज संपतं.. सारे दहा दिशांना पांगतात... आपण मात्र ठरवलेलं
असतं पक्कं की आपली मैत्री कधीच तुटू द्यायची नाही. सुरूवातीला रोज फोन,
२-३ दिवसांनी भेटणं वगैरे उत्साहात होतं. मग काही काळाने वाटू लागतं की आता
आठवड्यातून एकदा भेटलं तरी चालेल... त्या आठवड्याचा महीना कधी होतो समजतही
नाही. मग नोकरी... नवे मित्र...! त्याचे फोन तरीही येत राहतात
अधूनमधून.... कंटाळून शेवटी ते फोनही कमी होतात. आता बोलण्यातही मधे मधे
gaps येऊ लागतात. मनाची समजूत घातली जाते की आता वेळ मिळत नाही... Life
busy झालंय पार! नंतर कधीतरी वाटतं... आताशा आपलं बोलणं होत नाही विशेष..
पण ठीक आहे... चलता है... तो तरी कुठे फोन करतो आता! आणि मग बर्याच
वर्षांनी कधीतरी जुना काहीतरी reference सापडतो... आपल्याला अचानक जुन्याच
मैत्रीचा नव्याने उमाळा येतो आणि.... मग फेसबुकात स्वतःचाच जुना चेहरा
शोधायची आणि दाखवायचीही धडपड केली जाते...
"कसा आहेस? कुठे असतोस हल्ली?"
"बरा आहे. इथेच आहे. तू?"
"मी पण"
"..."
"जमलंच नाही रे touch मधे रहायला... projects, deadlines वगैरे... "
"it's ok!"
"भेटूया ना कधीतरी"
"हो. नक्कीच..."
"..."
"चल.. नंतर बोलू. meeting आहे. bye. tc."
समोरची chat window बघता बघता निर्जीव होते. तो "नंतर" बहुधा उगवतच नाही. फक्त एक दोर कापल्याची जाणीव कुठेतरी हुळहुळत राहते...
(maayboli.com वर पूर्वप्रकाशित)
Copyright © roopavali. All rights reserved
"कसा आहेस? कुठे असतोस हल्ली?"
"बरा आहे. इथेच आहे. तू?"
"मी पण"
"..."
"जमलंच नाही रे touch मधे रहायला... projects, deadlines वगैरे... "
"it's ok!"
"भेटूया ना कधीतरी"
"हो. नक्कीच..."
"..."
"चल.. नंतर बोलू. meeting आहे. bye. tc."
समोरची chat window बघता बघता निर्जीव होते. तो "नंतर" बहुधा उगवतच नाही. फक्त एक दोर कापल्याची जाणीव कुठेतरी हुळहुळत राहते...
(maayboli.com वर पूर्वप्रकाशित)
Copyright © roopavali. All rights reserved
Subscribe to:
Posts (Atom)