Tuesday 7 May 2013

व्यथा

आयुष्य एका हाताने देतं तर इतर अनंत हाताने काढून घेतं हेच खरं असावं. कारण जमाखर्च मांडायला गेलं की कळतं, काल सुखाचा ढीग जमेत आहे असं वाटत होतं त्याच्या जागी आज वाकुल्या दाखवणारं रिकामपण आहे. आपली चूक इतकीच की आपण खूष व्हायची घाई केलेली असते. आता नशीब, नियती कोणाच्याही डोक्यावर खापर फोडलं तरी घडलेलं बदलत नाही. हातात राहतं ते इतकंच... हताश डोळ्यांनी सारं काही जाताना पाहणं!

हे जे घडलं ते का घडलं, असंच का घडलं... कोण चुकलं हे निरर्थक प्रश्न हुळहुळत राहतात. त्यांना काही अर्थ नाही. हातून पुन्हा एकदा एखादा हात सुटलेला असतो. हृदयाच्या काचेला अजून एक मोठ्ठा तडा गेलेला असतो. जी स्वप्नं आपल्या नशीबात नाहीत ती पाहण्याची शिक्षा पुन्हा मिळालेली असते. शब्द... शब्दच राहीलेले असतात. कोणालातरी दुखावल्याचं अजून एक पातक additionally डोक्यावर आलेलं असतं. आपल्याच भावनांशी प्रामाणिक राहिल्याबद्दल मिळालेलं हे बक्षीस!

भळभळती जखम घेऊन फिरणार्‍या अश्वत्थाम्याची व्यथा नेमकी आपल्याच वाट्याला यावी... याची तक्रार कोणाकडे करायची?


Copyright © roopavali. All rights reserved

2 comments:

  1. आपली चूक इतकीच की आपण खूष व्हायची घाई केलेली असते.
    vvaa !! bahot khoob :)

    ReplyDelete
  2. आपल्याच भावनांशी प्रामाणिक राहिल्याबद्दल मिळालेलं हे बक्षीस! he pan mast :)

    ReplyDelete