Saturday 3 August 2013

मैत्रीदिन

सुखदु:खात माझी साथ देणाऱ्या
मला सावरायला हात देणाऱ्या
मला एकटं पाडणाऱ्या नियतीला
वेळोवेळी मात देणाऱ्या

कधी धीर देत तर कधी रागे भरत
कधी मला गरज असतानाच अवतरत
माझ्या प्रत्येक मूडला सहन करत
इथवर माझ्यासोबत येणाऱ्या

मला प्रत्यक्ष भेटलेल्या, न भेटलेल्या
दूर असून सुद्धा जवळ असलेल्या
माझ्या आयुष्यात हजारो रंग भरत
त्याचा अविभाज्य भाग बनलेल्या… 

माझ्या प्रत्येक मैत्राला मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Copyright © roopavali. All rights reserved

2 comments:

  1. अतिशय सुंदर. हे मी कॉपी करुन घेतोय माझ्याकडे. पुढच्या मैत्रीदिनाच्या शुभेच्छापत्रात वापरायला उपयोगी पडतील. अर्थात परिस्थिती अनुरूप वगैरे शब्दांत थोडा बदल करेन. :)

    ReplyDelete