Sunday 1 June 2014

ओळख

तू कधी चांदणे, कधी सूर्य दाहकसा
कधी अनोळखी तर कधी मनाचा आरसा

कधी निकट असा की दूर वाटती श्वास
पण दूरही इतका जणू वाटसी भास

लाटांचे तांडव, कधी होसी किनारा
कधी झुळूक कोवळी, कधी वादळी वारा

समृद्ध जलाशय की तहानली ओंजळ
तू स्वप्न, सत्य की कविकल्पना केवळ?


Copyright © roopavali. All rights reserved

No comments:

Post a Comment