Wednesday, 24 April 2013

वेडे नाते

टेबलावर निरर्थक लिहीताना नकळत
बोटं तुझं नाव गिरवायला लागतात
कामात गुंतलेले सारेच क्षण
तुझ्या विचारांत हरवायला लागतात

स्वप्नात भेटणं जुनं झालं कधीच
आता प्रत्यक्षात पण तुझा भास होतो
केसांशी खेळणारा वाऱ्याचा झोका
मानेशी रुळणारा तुझा श्वास होतो

तुझी ओढ, तुझी आस, तुझा छंद मला
तुझी नसूनही तुझी होऊन जाते मी
तुझ्यामाझ्यातले निनावीच बंध
उरी तरी जपते हे वेडे नाते मी


Copyright © roopavali. All rights reserved

1 comment: