Tuesday 1 July 2014

कशी आहेस?

चांदण्यागत तलम
मनात खोल झिरपत जाणार्‍या आवाजात
रोज विचारतोस 'कशी आहेस'?
तुझ्या पहिल्या शब्दाबरोबरच
विरघळत जाणारी मी
त्या क्षणी कशी असते
हे खरंच कळत नाही तुला?


Copyright © roopavali. All rights reserved

1 comment: