Tuesday 1 July 2014

अव्याहत

उद्या सकाळी फोन करतो म्हणालास..
बहुधा सहजच म्हणाला असशील
तुझी सकाळ केव्हाच संपली
माझी संपूनही बराच वेळ झाला
संपली नाहीये ती एकच गोष्ट...
माझं अव्याहतपणे तुझी वाट पाहणं!
जे लवकर संपावंसं वाटतं तेच सगळ्यात जास्त रेंगाळतं हेच खरं!!


 
Copyright © roopavali. All rights reserved

No comments:

Post a Comment